कवितेची विशेषणे !

कवितेची विशेषणे ! एकदा वाचुन पटकन कळते सोपी कविता… दोनदा वाचुन मनात नाचते साधी कविता… वाचुन मनात उच्छाद मांडते मस्त कविता… वाचता वाचता गुणगुण गाते झक्क कविता…. वाचुन कळते नंतर वळते मुग्ध कविता.. लगेच वाचते मनात साचते शब्द कविता…. नकळत कळते कळुनही पळते गुढ कविता….. वाचताना हसते चंचल दिसते रम्य कविता….. शब्दात जगते शब्दाला जागते [...]

……सरी ग सरी……

……सरी ग सरी…… सरी ग सरी…… सरी ग सरी…… आल्या ग सरी….. आल्या ग सरी….. —————————————-———— काळ्या मेघाची तू लेक आलि वाजत गाजत ह्या भल्या पावसात चिंब निघालि भिजुन.. ओलि ओलि तुझी काया वेगळिच असे माया फ़ुटे मातीला अंकुर.. स्पर्श तुझाच वेगळा कोणी दुखात रडते.. कोणी सुखात रडते तू भिजवून त्यांना.. त्यांच्या आश्रूच झाकते सुर्य [...]

मी एक पाउसवेडा

मी एक पाउसवेडा ताज्या ओल्या मातीवरून मोतीभरल्या तृणावरुन हिरव्याकच्च झाडीमधून मी खुप खुप चालत असतो मी एक पाउस वेडा फ़क्त पावसालाच शोधत असतो…. वाट फुटल्या रस्त्यावरून शांतचित्त खड़कावरुन वेड लागलेल्या वा-यामागुन मी धाव धाव धावत असतो मी एक पाउस वेडा फ़क्त पावसालाच शोधत असतो…. ऋतुमती धरेसोबत फडफडणा-या पंखासोबत ओघळणा-या थेंबासकट मी थुई थुई नाचत असतो [...]

शब्द मौनानं पाळला……!!!

शब्द मौनानं पाळला……!!! तुझ्या भेटीची खुमारी अशी चढली चढली जसा मोगरा फुलला भर उन्हात दुपारी अलगद वर आली होती दडली दडली मनी सागर मातला फक्त मोतीच पदरी आज परत बावळी वाट पाहीली पाहीली अशी घालतोस कसा तु साद वेळी अवेळी घडेल काहीच्या बाही म्हणताना नाही नाही शब्द मौनानं पाळला बोलू नको कुठे काही मिलनाने तुझ [...]

कोसळ.. पावसाचा…..

कोसळ.. पावसाचा….. अरे पावसा पावसा असा कोसळ कोसळ होऊ दे रे ओलं ओलं माझं केतकीचं भाळ.. अरे गार गार वा~या असा झोंब अंगोपांगी तापलेली तनु माझी होऊ दे रे शीतलांगी.. अरे मातीच्या सुगंधा असा धुंद दरवळ रोधलेल्या नि:श्वासांचे माझ्या फुलू दे कमळ.. अरे सावळ्या आभाळा होउनी जा मखमाली भेटता रे मला सखा तुझे पांघरुण घाली……. [...]

****हा थडगा जर भेटला***

****हा थडगा जर भेटला*** . . तुला शोधता शोधता मी मला गेलो हरवून सावलीही माझी गेली कधीची मला विसरून किती भाग्यवान आहेस निदान मी तुला शोधतोय मी दूर गेलो तरी हरेक सुखात आनंदात नांदतोय तूही अशीच कुठेतरी प्रिये आनंदात नांदत असशील कुणाच्या रातीला स्वप्नांचे महल बांधत असशील तरी कधी काळी वाटेत हा थडगा जर भेटला [...]